11 villages in Akole taluka will get 26 lakhs each 
अहिल्यानगर

अकोले तालुक्‍यातील 11 गावांना मिळणार प्रत्येकी 26 लाख 

शांताराम काळे

अकोले : तालुक्‍यातील 52 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मोग्रस, शेरणखेल, उंचखडक खुर्द, म्हाळादेवी, मनोहरपूर, वाघापूर, निंब्रळ, चितळवेढे, निळवंडे, कळंब, बहीरवाडी अशा एकूण 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, 41 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. 

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतींना 26 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. अकरापैकी माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील सात, आमदार डॉ. किरण लहामटे तीन, तर शिवसेनेच्या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

तालुक्‍यात 466 जागांसाठी 1 हजार 132 अर्ज होते. 385 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 287 जागांसाठी 568 उमेदवार रिंगणात असून, 179 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणुकीसाठी दीड हजार कर्मचारी काम करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT