

Harbhajan Singh Strategy to Dismiss Vaibhav Sooryavanshi
Sakal
भारताचा १५ वर्षांचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने आयपीएल २०२६ मध्ये तर कमालीचा खेळ केला. १६ सामन्यात ७७६ धावा त्याने ठोकताना सर्वोत्तम खेळाडू आणि ऑरेंज कॅपसह ५ मोठे पुरस्कार जिंकले.
त्याने या स्पर्धेत जसप्रीत बु्मराह, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट अशा दिग्गज गोलंदाजांविरूद्धही त्याने मोठे फटके मारताना मागे-पुढे पाहिले नाही. त्यामुळे त्याच्या स्फोटक फलंदाजीचे कौतुक अनेकांनी केले आहे. त्याच्याविरुद्ध कोणता गेम प्लॅन हवा याबाबतही बरीच चर्चा झाली. आता हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्याच्याविरुद्ध त्याने कशी गोलंदाजी केली असती याबाबत भाष्य केले आहे.