

Sukhbir Singh Badal Attack
ESakal
शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेड शहराबाहेरील माता साहिब गुरुद्वाराजवळ एका निहंग शीखाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या सुरक्षेतील एक पोलीस अधिकारीही जखमी झाला आहे. बादल यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी सकाळी त्यांनी आपल्या कुटुंबासह तख्त श्री पटना साहिबला भेट दिली होती. या घटनेनंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.