crime sakal
अहिल्यानगर

नेवाशात दोन गटांत तुंबळ मारामारी; पंधरा आरोपींना अटक

सुनिल गर्जे

नेवासे (जि. अहमदनगर) : खेळताना दोन लहान मुलांत झालेल्या भांडणावरून नेवासे शहरातील वडार गल्ली येथे दोन गटांत तुंबळ 'फ्री-स्टाईल' मारामारी झाली. हा प्रकार सोमवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास घडला. यात दोन्ही गटांतील एकूण पाच जण जखमी झाले. याप्रकरणी मंगळवारी रात्री परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादींवरून नेवासे पोलिसांत एकूण सोळा जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.

अप्पा आळपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की एकत्र खेळत असलेल्या दोन लहान मुलांत किरकोळ वाद झाला. त्यातून मुक्ताबाई मोहन इरले, संदीप मोहन इरले, किरण मोहन इरले (सर्व रा. नेवासे खुर्द), अशोक पिराजी धोत्रे, संभाजी पिराजी धोत्रे, अजय धोत्रे, शुभम धोत्रे (सर्व रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) यांनी आपल्या घरी हातात काठ्या घेऊन येत शिवीगाळ केली. दोन्ही भावांसह आईला काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात आप्पा, मुकिंदा व अशोक आळपे हे तिघे जखमी झाले. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुक्ताबाई मोहन इरले (रा. वडार गल्ली, नेवासे शहर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की लहान मुलांच्या भांडणावरून मुकिंदा भीमराज आळपे, आबा भीमराज आळपे, अशोक भीमराज आळपे, सुरेश भीमराज आळपे, मोहन पिराजी डुकरे, सुनीता आबा आळपे, चांगुणाबाई भीमराज आळपे (सर्व रा. वडार गल्ली, ता. नेवासे), तसेच सचिन मुन्ना, रमेश धोत्रे, लक्ष्मी रमेश धोत्रे (दोघे रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) यांनी हातात चाकू, लोखंडी गज, दगड घेऊन माझ्या घरी येत मारहाण केली. यात भाचा व भाऊ जखमी झाले आहेत.

पोलिस निरीक्षकांची उत्कृष्ट कामगिरी

गंगानगर, वडार गल्ली हे अतिसंवेदनशील भाग आहेत. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी हे प्रकरण मोठ्या कौशल्याने हाताळत, कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता मोठ्या शिताफीने यातील पंधरा आरोपींना अटक केली. या भागात एकाच वेळी एवढ्या संख्येने आरोपींना अटक करण्याची ही कदाचित नेवासे पोलिसांची पहिलीच कारवाई असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा बदल? पेन्शनधारकांना मिळू शकते ४५ हजारांची किमान पेन्शन

Pune Stunt Video : पुण्यात परप्रांतीय तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा, दारूच्या नशेत भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी अन्... व्हिडिओ व्हायरल

CIDCO Housing Lottery: स्वातंत्र्य दिनानिमित्त ४,७७९ घरांची लॉटरी सिडकोची 'ईडब्ल्यूएस'साठी संधी

Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

SCROLL FOR NEXT