मुंबई नाशिक महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले असून यांना शहापूर जिल्हा उप रूग्णालयात दाखल केले आहे. हे सर्व एका सिमेंटच्या गाडीने मालेगाव हून भिवंडीला येत होते. नवीन कसारा घाटात घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक बाजूला असलेल्या दरडीला आदळला व पलटी झाला. फोनद्वारे माहीती देऊन सुद्धा टोल प्रशासनाने एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.