अहमदनगर जिल्ह्यात विधानसभा लढविण्यासाठी राष्ट्रवादीकडून २१ इच्छुक sakal
अहिल्यानगर

अहमदनगर जिल्ह्यात विधानसभा लढविण्यासाठी राष्ट्रवादीकडून २१ इच्छुक, फाळकेंची माहिती; पुण्यात सोमवारी मुलाखती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढते आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढते आहे. आतापर्यंत २२ जणांनी अधिकृतपणे इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे यात आघाडीतील मित्रपक्षासोबतच भाजपमधील नेत्यांचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पक्षातील उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादीची ताकद विखुरली जाईल, असा विरोधकांचा कयास होता. परंतु राष्ट्रवादीला (पवार गट) जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. लोकसभा निवडणुकीत ते मतदारांनी स्पष्ट केले आहे. इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती होणार आहेत, असे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सांगितले.

जिल्ह्यात बारा मतदारसंघ आहेत. त्यातील आठ जागांवर राष्ट्रवादीचा दावा आहे. कर्जत-जामखेड, राहुरी, श्रीगोंदे, पाथर्डी, नगर शहर, अकोले, कोपरगाव, पारनेर आदी मतदारांचा त्यात समावेश आहे. संगमनेर, श्रीरामपूरमधून एकाही इच्छुकांचा अर्ज आला नाही. सर्वच ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिले जातील. जागावाटपाबाबत दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. एखाद-दुसऱ्या जागेची अदलाबदल होण्याची शक्यताही फाळके यांनी व्यक्त केली.

मतदारसंघनिहाय इच्छुक

  • अकोले - अमित भांगरे, मधुकर तळपाडे

  • कोपरगाव - दिलीप लासुरे, संदीप वर्पे

  • शिर्डी - रणजित बोठे, ॲड. नारायण कार्ले

  • नेवासे - डॉ. वैभव शेटे

  • शेवगाव-पाथर्डी - प्रताप ढाकणे, विद्या गाडेकर

  • राहुरी - आमदार प्राजक्त तनपुरे.

  • पारनेर - राणी लंके, रोहिदास कर्डिले, माधवराव लामखडे

  • नगर शहर - डॉ. अनिल आठरे, शौकत तांबोळी, अभिषेक कळमकर

  • श्रीगोंदे - बाबासाहेब भोस, राहुल जगताप, श्रीनिवास नाईक, अण्णासाहेब शेलार.

  • कर्जत-जामखेड- आमदार रोहित पवार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT