3 children died by drowning  Sakal
अहिल्यानगर

सख्या भावंडांसह तीन चिमुरड्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

गौरव साळुंके

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : तालुक्यातील कान्हेगाव परिसरात आदिवासी कुटुंबातील तीन चिमुरड्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. येथील प्रवरा नदीपट्यातील कान्हेगाव शिवारात आज (सोमवारी) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे कान्हेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

चैतन्य अनिल माळी (वय १० वर्ष), दत्ता आनिल माळी (वय ८ वर्ष) व चैतन्य शाम बर्डे (वय ८ वर्ष) असे त्यांची नावे असल्याची माहिती पोलिस निरिक्षक मधुकर साळवे यांनी दिली. कान्हेगाव येथील अतुल बाळासाहेब खरात यांच्या शेततळ्यात खेळण्यासाठी गेलेले तिन्ही चिमुरडे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. ही माहिती मिळताच ग्रमस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पहाणी केली. काही वेळानंतर पोलिसांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढुन येथील कामगार रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठविले. दुपारी उशिरापर्यंत मृतदेह उत्तरणीय तपासणी करुन पंचनामा करण्याची कारवाई सुरु होती.

चैतन्य माळी व दत्ता माळी हे दोघे सख्ये भाऊ असून ते चैतन्य बर्डे यांच्यासह आज (सोमवारी) सकाळी शेततळ्याच्या परिसरात खेळण्यासाठी गेले होते. यापैकी तिघे चिमुरडे कपडे काढुन पाणी खेळण्यासाठी शेततळ्यात उतरले. मात्र पोहता येत नसल्याने तसेच शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे मयताच्या माळी आणि बर्डे कुटुंबियांसह कान्हेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT