33 percent of electricity bill for development of MSEDCL infrastructure in the same village 
अहिल्यानगर

वीजबिलाची 33 टक्के रक्कम त्याच गावातील महावितरण यंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : नवीन शेतीविषयक वीज धोरणाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. गावाने भरलेल्या वीजबिलाची 33 टक्के रक्कम त्याच गावातील महावितरण यंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरली जाईल. शेतीला दिवसा वीज देण्यासाठी वांबोरीत सौर वीज प्रकल्प उभारणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. 

कात्रड येथे जेऊर-कात्रड रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, किसन जवरे, संदीप निकम, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते. कात्रड येथे ग्रामपंचायत प्रांगणात मंत्री तनपुरे यांनी जनता दरबार घेतला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता ए. व्ही. खेडकर, सहायक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, राजेंद्र तेलोरे, विजय कापसे, रावसाहेब निकम उपस्थित होते. 

मंत्री तनपुरे म्हणाले, ""सामान्य जनतेला समस्या सोडविण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. जनतेचे प्रश्न गावात जाऊन तत्काळ सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करीत आहे. शेतीविषयक वीज धोरणाला मंजुरी मिळाली आहे. शेतीच्या वीजबिलाची 33 टक्के रक्कम, त्याच गावातील पायाभूत सुविधांसाठी व 33 टक्के रक्कम जिल्ह्यातील महावितरणच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून, शेतीला अखंडीत वीजपुरवठा करणे शक्‍य होईल.'' 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT