3300 tribal families in Shrirampur constituency are eligible for Khawati grant scheme 
अहिल्यानगर

आदिवासी 3300 कुटुंबांना खावटी अनुदानाचा लाभ

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : मतदारसंघातील आदिवासी तीन हजार 300 कुटुंबे खावटी अनुदान योजनेसाठी पात्र ठरली आहेत. आदिवासी बांधवांना प्रतिकुटुंब चार हजार रुपयांप्रमाणे सुमारे एक कोटीचे अनुदान मिळणार आहे. सरकारच्या खावटी अनुदानाचा लाभ तालुक्‍यातील जास्तीत जास्त आदिवासी कुटुंबांना मिळण्यासाठी आमदार लहू कानडे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील, तत्कालीन गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, ग्रामसेवक व तलाठी यांची बैठक घेऊन सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या होत्या. 

ईपीएस-95 पेन्शनधारक संघटनेतर्फे परिपत्रकाची होळी 

श्रीरामपूर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या निषेधार्थ ईपीएस-95 पेन्शनधारक संघटनेने ईपीएफओ विभागीय कार्यालयासमोर नुकतीच परिपत्रकाची होळी केली. याबाबत संबंधित आयुक्तांना प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले असून, मासिक पेन्शन साडेसात हजारांसह महागाई भत्ता देण्याची मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी केली. ईपीएफओने 31 मे 2017 चे अंतरिम पत्र मागे घेऊन निवृत्तिवेतनधारकांना उच्च पेन्शनचा पर्याय द्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना, जे ईपीएस-95 योजनेचे सभासद नाहीत, त्यांना व्याजासह योगदान परत मिळवून आणि थकबाकीच्या रकमेची परवानगी देऊन सदस्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. अशोक राऊत, सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT