hasan mushrif esakal
अहिल्यानगर

अहमदनगर जिल्हा वार्षिक नियोजनासाठी 510 कोटींचा आराखडा मंजूर

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी 510 कोटी रुपयांचा आराखड्यास मंजुरी जिल्हा नियोजन समितीने दिली आहे. रस्त्यांसाठी 102 कोटी, शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी अडीच कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी 144 कोटीी आदिवासी उपाययोजनांसाठी 46 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची सोमवारी (ता. 8) सावेडीतील माऊली सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्‍त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप सुराणा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्याला मागील वर्षी 475 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. कोरोना उपाययोजनांसाठी 30 टक्के निधी खर्च करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. आरोग्य विभागावर 105 कोटी 20 लाखांचा खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी असलेले उपरुग्णालय तथा ग्रामीण रुग्णालयांसाठी 14 ऑक्‍सिजन निर्मितील प्रकल्प उभारले आहेत. त्यासाठी योग्य ती विद्युत व्यवस्था, अतिरिक्‍त बेड निर्मिती, पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन सिलेंडर, औषधे, इतर साहित्य खरेदी करण्यात आले आहे. अनुसूचित जाती उपयोजनांवर 144 कोटी, आदिवासी उपयोजनांवर 46 कोटी खर्च करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट असतानाही शंभर टक्के निधी जिल्ह्याला देण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यामुळे यावर्षी जिल्हा नियोजन समितीला मागील वर्षीपेक्षा 65 कोटी जादा निधी मंजूर झाला आहे. या 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यासाठी 510 कोटी रुपयांचा नियतव्यय आहे. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 102 कोटी, प्राथमिक शाळा खोल्या बांधकामासाठी 29 कोटी, अहमदनगर शहरातील बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाकरिता सात कोटी, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात आग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी अडीच कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना रुग्ण उपचार आणि आरोग्य सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तीन प्राथमिक केंद्र वाढणार

माका (नेवासे), तिळवणी (ता. कोपरगाव) आणि कोऱ्हाळे (ता. राहाता) या तीन ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केले जाणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव करण्यात आला आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालकांकडे या केंद्राच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविण्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे.

तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा

जिल्ह्यात नव्याने तीन तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा नियोजन समितीने दिला आहे. श्री जगदंबा माता मंदिर देवस्थान, ब्राह्मणगाव (ता. कोपरगाव), श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर देवस्थान, मनोहरपूर (ता. अकोले) आणि श्री सदगुरू हरिहर सत्संग लिंगतीर्थ ट्रस्ट, इसळक (ता.नगर) यांचा समावेश आहे. या ठिकाणी क वर्ग देवस्थानच्या सुविधा उभारल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT