60 thousand stolen from the house of a retired officer in Nagar district 
अहिल्यानगर

निवृत्त अधिकाऱ्याचा बंगला फोडला; 60 हजारांचा मुद्देमाल लंपास

सकाळ वृत्तसेवा

नगर (अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विश्‍वास माधवराव शेळके यांचा माणिकनगर येथील बंगला फोडून चोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार समोर आला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

शहरातील माणिकनगरमधील एमएससीबी कॉलनीत सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विश्‍वास शेळके राहतात. त्यांचा मुलगा योगेश शेळके पुण्यात नोकरीला असल्याने दरवर्षी सुटीत ते कुटुंबासह पुण्याला जातात. दिवाळीनिमित्त 14 नोव्हेंबरला पहाटे ते कुटुंबासह पुण्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी मुख्य दरवाजाला आतून कडी लावून किचनच्या दरवाजाला कुलूप लावले होते. बंगल्याच्या गेटलाही कुलूप लावले होते. काल दुपारी तीन वाजता ते घरी आले असता, त्यांना किचनच्या दरवाजाला कुलूप दिसले नाही. दाराचा कडी-कोंयडा तुटलेला होता.

घरातील फ्रिजवर कुलूप ठेवले होते. घराची पाहणी केली असता, बेडरूममधील कपाट उघडे दिसले. कपाटातील सोन्याचे दागिने व पैसे, असा एकूण 60 हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे दिसून आले, असे शेळके यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT