corona
corona  
अहमदनगर

नगरमध्ये कोरोनाचा नवा उच्चांक ः एकाच दिवशी सापडले 66 रुग्ण 

विनायक लांडे

नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात आणखी 66 रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 794 झाली आहे. 

आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 21 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. महापालिका क्षेत्रातील अरणगाव रस्त्यावरील पाच, सर्जेपुरा, तारकपूर, गवळीवाडा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय जामखेड, श्रीरामपूर, नेवासे येथील प्रत्येकी दोन बाधित आहेत. भिंगार (नगर), कर्जत, अकोले, संगमनेर, श्रीगोंदे, राहुरी, पारनेर येथील प्रत्येकी एकाला कोरोनाची बाधा झाली. रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात नगर शहरातील 13 जणांमध्ये चितळे रस्त्यावरील सहा, सिद्धार्थनगरमधील दोन, पद्मानगर, टिळक रस्ता, सारसनगर, सावेडी आणि शिंपी गल्लीतील एकाचा समावेश आहे. सोनई (नेवासे) दहा, संगमनेर तालुक्‍यातील नऊ, श्रीगोंदे तालुक्‍यातील दोन, शेवगाव, भिंगार (नगर) येथील प्रत्येकी एकाला बाधा झाली आहे. संगमनेर तालुक्‍यातील गुंजाळ मळा दोन, हिवरगाव पावसा, कासारा दुमाला, चास पिंपळदरी, मिर्झापूर येथील प्रत्येकी एक आणि घुलेवाडीतील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. श्रीगोंदे तालुक्‍यातील चिंभळे, चांभुर्डी येथील प्रत्येकी एकाला बाधा झाली. शेवगाव तालुक्‍यातील निंबेनांदूर येथे एक रुग्ण आढळून आला. भिंगार येथील गवळीवाडा येथील एकाला बाधा झाली. 

खासगी प्रयोगशाळेतील नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यात महापालिका क्षेत्रातील तीन, राहाता तीन, श्रीरामपूर दोन, पाथर्डी येथील एकाचा समावेश आहे. लवकरच सुरक्षेबाबत नागरिकांनी सतर्कता बाळगली नाही, तर कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सध्या 281 जणांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, नालेगाव हडको येथील एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने नगररचना विभाग बंद करण्यात आला. त्यानंतर तातडीने त्या ठिकाणी औषधफवारणी करण्यात आली. 

आणखी 13 जणांची कोरोनावर मात 
जिल्ह्यात आज 13 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यात श्रीरामपूरचे पाच, महापालिका क्षेत्रातील दोन, भिंगार (नगर) तीन, संगमनेर, राहाता, शेवगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 494 झाली आहे. 

संपादन : अमित आवारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT