Corona Test esakal
अहिल्यानगर

संगमनेर तालुक्यातील ६९ गावे कोरोनामुक्त

आनंद गायकवाड

संगमनेर ः तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्याने सुमारे 69 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तसेच, ८९ गावांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहाच्या खाली असल्याने तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत आहे.

देवकौठे ते बोटा असा सुमारे शंभर किलोमीटरचा विस्तार असलेल्या व मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्णत्रिकोणावरील महत्त्वाच्या ठिकाणी वसलेल्या तालुक्यात १७४ गावे व सुमारे २६३ वाड्या-वस्त्या आहेत. कोविडवरील उपचारासाठी कोपरगाव, राहाता, सिन्नर, पारनेर, अकोले, जुन्नर आदी तालुक्यांतील रुग्ण येथे येतात. (महसूलमंत्री थोरात कोविडच्या दोन्ही लाटांत तालुक्यावर लक्ष ठेवून होते. सातत्याने आढावा बैठकांतून सूचना देत होते. घरोघरी आरोग्य तपासणी, बाधितांचे तातडीने विलगीकरण व रुग्ण शोधण्याची प्रक्रिया वेगाने राबविली.(69 villages in Sangamner taluka free from corona)

महसूलमंत्री थोरात कोविडच्या दोन्ही लाटांत तालुक्यावर लक्ष ठेवून होते. सातत्याने आढावा बैठकांतून सूचना देत होते. घरोघरी आरोग्य तपासणी, बाधितांचे तातडीने विलगीकरण व रुग्ण शोधण्याची प्रक्रिया वेगाने राबविली. परिणामी, योग्य व वेळेवर उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ झाली.

थोरात यांच्या पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालय व कॉटेज हॉस्पिटलकरिता चार रुग्णवाहिका, पाच बायपॅप मशिन, तालुकास्तरावरील पहिले आरटीपीसीआर मशिन, दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह अनेक आधुनिक सुविधा मिळाल्या. तसेच लसीकरणाचीही विशेष मोहीम राबविली गेली. या विविध उपाययोजनांमुळे आजअखेर तालुक्यातील ६९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. एक ते आठ रुग्णसंख्या असलेल्या गावांची संख्या ८९ असून, ही गावेही लवकरच कोरोनामुक्त होणार आहेत.(69 villages in Sangamner taluka free from corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT