nevase 
अहिल्यानगर

...म्हणून ज्ञानेश्वरीची जयंती साजरी केली जाते

सुनील गर्जे

नेवासे (नगर) : विश्वाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे नगरीत रचलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात जीवनाचे सार आहे. यामुळे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करून जीवनात मनुष्य जीवाला धन्य बनवा, असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.

संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ७३१ वी ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी देशमुख महाराज बोलत होते. उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक अँड. बापूसाहेब गायके, सुनील वाघ, आशिष कावरे, मंदिर व्यवस्थापक भगवानराव सोनवणे उपस्थित होते.
 
यावेळी गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते माऊलींच्या 'पैस' खांब व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. देशमुख महाराज म्हणाले, माऊलींनी ७३० वर्षांपूर्वी नेवासे येथे पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तर सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली आहे. तिथी नुसार शके १२१२ ते आतापर्यंत ज्ञानेश्वरीला ७३० वर्षे पूर्ण झाले.

आज आलेल्या भाद्रपद वद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली, कारण ज्ञानेश्वरी अगोदरच शुद्ध होती. मात्र त्याकाळी छपाई नसल्याने एकमेकांकडून प्रत लिहून घेण्याची पद्धत होती. त्यामुळे अनेक कानामात्रा वेलांटी चुकत गेल्या म्हणून भाद्रपद वद्य षष्ठीला ती शुद्ध झाली.  म्हणून ज्ञानेश्वरीची जयंती साजरी करण्यात येते. 

यावेळी गोरख भराट, आप्पा महाराज होन, अंबादास भागवत, शांताबाई खरड, शंकर तनपुरे, आदित्य चव्हाण उपस्थित होते. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर शंकर नाबदे यांनी आभार मानले.

ज्ञानेश्वरी जयंतीवर कोरोनाचे सावट... 

गेल्या सहा वर्षांपासून नेवासेजवळील पुणे येथील श्री संत सेवा संघाच्या वतीने  मिरवणूक काढून ज्ञानेश्वरी जयंती साजरी करत आले आहे. मात्र यावर्षी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व उत्सव बंद असल्याने ज्ञानेश्वरी जयंती निमित्त घरोघरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT