7th std students Soham made Electric car
7th std students Soham made Electric car  esakal
अहमदनगर

गुणवत्तेला बुध्दिमत्तेची साथ; सातवीच्या सोहमने बनवली Electric Car

सकाळ वृत्त सेवा

अकोले (जि. नाशिक) : अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुलच्या इयत्ता सातवीत शिकत असलेल्या सोहम उत्तम शेणकर या विद्यार्थ्याने बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक कारचे (Electric car) मॉडेल बनविले. गुणवत्तेला बुध्दिमत्तेची साथ असेल आणि योग्य मार्गदर्शन असेल तर काहिही अशक्य नाही. याचा प्रत्यय अभिनव शिक्षण संस्थेत आला आहे.

ग्रामीण भागातील युवकांची भरारी

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन (Lockdown) मध्ये सातवीत शिकणार्‍या सोहमने प्लंबींगच्या साहित्याचा उपयोग करुन बॅटरीवर चालणार्‍या इलेक्ट्रीक कारचे मॉडेल बनवुन ते चालवुन दाखविले. त्याला मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुलच्या शिक्षिका वैशाली आवारी यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याच्या या उपक्रमाचे अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी कौतुक करताना म्हणाले की, उद्योग क्षेत्रात ठराविक लोकांनीच काम करावे असे काही नसून ग्रामीण भागातील युवक सुद्धा तंत्र क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात, त्यांच्या मध्येही टॅलेंट असून सोहम शेणकर हे एक उत्तम उदाहरण आहे. सोहमने संशोधन व कल्पकता याची योग्य सांगड घालून इलेक्ट्रिक कार बनविली याबाबत त्याचे कौतुक केले. या कार चे मॉडेल विकसित करून आर्थिक पाठबळ देऊ असे सांगितले.

यावेळी गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थी म्हणुन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा खर्‍या अर्थाने त्यांचा शिक्षणाचा उपयोग करत प्रयोगशील रहावे व ध्येय साध्य करावे यासाठी अभिनव शिक्षण संस्था कटिबद्ध असल्याचे मत संस्थेचे सचिव प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी अभिनवच्या सर्व विभागाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार हेमंत मंडलिक यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT