973 crore announced for pensioners
973 crore announced for pensioners 
अहमदनगर

पेन्शनधारकांसाठी कोरोना महामारीत आली गुड न्यूज

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः कोरोनाच्या संकटात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे."ईपीएफओ'ने एक जून नवीन बदल केले आहेत. त्यासाठी कोट्यवधी रूपये जाहीर केले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी दिली. 

"ईपीएफओ'बाबत निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शिफारशीवर आधारित कामगारांची अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली. त्यामुळे कामगारांना 15 वर्षांनंतर निवृत्तिवेतनाचे बदललेले मूल्य पूर्ववत करण्याची परवानगी मिळाली. यापूर्वी परिवर्तित निवृत्तिवेतन पुनःसंचयित करण्याची कोणतीही तरतूद नव्हती. त्यामुळे कमी निवृत्तिवेतन मिळत होते. ईपीएस-95 अंतर्गत निवृत्तिवेतनधारकांच्या हितासाठी उचललेले हे पाऊल आहे. ईपीएफओच्या 135 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत देशात 65 लाखांहून अधिक पेन्शनधारक आहेत. त्यांत सुमारे सहा लाख 30 हजार पेन्शनरना रिस्टोअरचा फायदा होणार आहे. "ईपीएफओ'कडून मे महिन्यापासून निवृत्तिधारकांच्या बॅंक खात्यांमध्ये वाढीव रक्कम अदा केली जाणार आहे. 

ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीचा अद्याप निर्णय झालेला नसून, राष्ट्रीय संघर्ष समिती त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पोखरकर यांनी सांगितले. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या मासिक पेन्शनच्या काही रक्कम एकरकमी देण्याचा पर्याय आहे. ईपीएफओ नियमानुसार 2008पूर्वी निवृत्त झालेल्या निवृत्तिधारकांना पेन्शनच्या एकतृतीयांश मासिक पेन्शन म्हणून त्यांच्या हयातीत दिली जाणार आहे. राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक राऊत यांनी पेन्शनवाढीचा मुद्दा लावून धरला होता. महिन्यापूर्वी हा निर्णय झाला असून, कालपासून त्याची अंमलबजावणी होत असल्याचे सांगण्यात आले. 

असा मिळेल लाभ 
निवृत्तीच्या वेळी 5 हजार रुपये पेन्शन लागू असलेल्या कर्मचाऱ्याने जर निवृत्तिवेतनाच्या एकूण रकमेपैकी एकतृतीयांश रक्कम काढून घेतली, तर त्यांना साधारणतः 3500 रुपयेच पेन्शन मिळत होती. 15 वर्षे ही पेन्शन घेतल्यानंतर पुढे दर महिन्याला त्यांना मूळ रक्कम, म्हणजेच पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT