crime sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime News : आरोपींवर कठोर कारवाई करा; आरपीआयची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी

पारनेर तालुक्यातील एका गावातील दलित समाजातील महिलेला खासदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केली मारहाण.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: पारनेर तालुक्यातील एका गावातील दलित समाजातील महिलेला खासदार नीलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर आहे. या गुन्ह्यातील आरोपीना जामीन होणार नाही, अशा पध्दतीची कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली.

आरपीआयच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंद्याचे राजा जगताप, पाथर्डीचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, राहाता तालुकाध्यक्ष करण कोळगे आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील एका गावात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ६ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे यांचा प्रचार केल्याच्या रागातून विखे समर्थकास मारहाण केली.

पत्नी तसेच आईला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेशी गैरवर्तन केले. सदर महिलेला पोलिस ठाण्यात जाता येऊ नये, असे दहशतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेमुळे पीडित कुटुंबीय अजूनही भीतीच्या सावटाखाली आहे. राजकीय वैमनस्यातून अशा प्रकारचे घडलेले कृत्य अतिशय निंदनीय असून, त्याची गंभीर दखल पोलिस प्रशासनाने घेऊन यामधील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी.

मंत्री रामदास आठवले भेट घेणार

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. लवकरच पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंत्री आठवले पारनेरला येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT