The accused in the rape case fled 
अहिल्यानगर

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पळाला 

मार्तंड बुचुडे

पारनेर : अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन बलात्कार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला. काल रात्री ही घटना पारनेर ग्रामीण रुग्णालयात घडली. पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढला. मात्र, आरोपीचा शोध लागला नाही. प्रवीण पोपट गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रवीण याने वडझिरे येथील एका अल्पवयीन मुलीस चार मे रोजी पळवून नेले होते. त्या मुलीच्या वडिलांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात पाच मे रोजी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यास शनिवारी अटक केली असून, त्यास सात दिवसांची पोलिस कोठडीही न्यायालयाने सुनावली आहे. परंतु काल सायंकाळी आरोपीने त्रास होत असल्याचे सांगितले.

त्यामुळे आरोपीस सायंकाळी साडेसहा वाजता ग्रामीण रुग्णालयात नेले होते. त्याची तपासणी करून आणले होते. मात्र, त्याने रात्री पुन्हा खूप त्रास होत असल्याचे नाटक केले व रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पारनेरचे पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्यासह पथकाने आरोपीस पुन्हा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले असताना रुग्णालयात गेल्यानंतर आरोपी प्रवीण याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळ काढला. पोलिसांनी ताबडतोब त्याचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला. आरोपी पळून गेल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाचा परिसर, तसेच पारनेर-सुपे रस्ता, पारनेर-वडनेर रस्ता व त्या परिसरात रात्रभर शोध घेतला. पोलिसांना आरोपी सापडला नाही. 

तालुक्‍यात उलट चर्चा 
आरोपी पळाला की पळवून लावला, अशी चर्चा मात्र तालुक्‍यात आता रंगली आहे. आरोपीची एकदा आरोग्य तपासणी केली असताना पुन्हा आरोपीने त्रास होत असल्याची तक्रार केली. पहिल्या वेळी आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला असावा, म्हणूनच आरोपीने मला पुन्हा त्रास होत आहे, असे नाटक रात्री अंधार पडल्यावर केले असावे. तसेच आरोपी पळाल्यानंतर रुग्णालय परिसरातून आरोपीस घेऊन जाण्यासाठीसुद्धा यंत्रणा तयार असावी. कारण पोलिसांनी शोध घेऊनही आरोपी सापडला नाही, असे बोलले जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT