action against those who spit 
अहिल्यानगर

गावात थुंकणाऱ्यांकडून असा दंड वसूल 

दौलत झावरे

नगर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांमुळे इतरांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. ग्रामीण जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईकरिता जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कंबर कसली आहे. थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाईसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचायत प्रशासनाकरिता प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो अंतिम टप्प्यात आहे. सभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईला सुरवात होणार आहे. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असतानाही सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा व्यक्तींवर कारवाई सुरू झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र, हे सर्व महापालिका हद्दीत व सरकारी कार्यालयांमध्ये सुरू आहे. तशीच कारवाई ग्रामपंचायत हद्दीत व्हावी, याबाबत आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून हालचाली सुरू केल्या गेल्या आहेत. त्यादृष्टीने आता प्रशासनाकडून अभ्यास करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव करण्यात येत असून, तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना प्रत्येकी 50 रुपये, तर साथरोग व इतर काळात प्रशासनाच्या निर्देशानुसार मास्क न लावणारे व गर्दी करणाऱ्यांना प्रतिव्यक्ती 50 रुपये शुल्क ग्रामपंचायतींमार्फत आकारण्याची तरतूद या प्रस्तावात करण्यात येणार आहे. 
सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी ही कारवाई करण्यात येणार असून, त्याअंतर्गतच हा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर ती कायमस्वरूपी राहणार आहे. या दंडात्मक कारवाईमुळे महसूल वाढणार असून, ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम यशस्वी होऊन तो परिसर संसर्गविरहित राहण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा नागरिक निरोगी राहण्यासाठी होणार आहे. 

असा होणार दंड 
ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना होणार 50 रुपये दंड 
सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास (साथरोगप्रसंगी) 
अनावश्‍यक गर्दी केल्यास (परिस्थितीनुसार) 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT