क्राईम ई सकाळ
अहिल्यानगर

अहमदनगर जिल्ह्यात आणखी दोन टोळ्यांना मोक्का

गोरक्षनाथ बांदल


अहमदनगर :
चोऱ्या, रस्तालूट, तसेच दरोडे घालणाऱ्या गुन्हेगारी दोन टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या’न्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. दहिगाव (ता. नगर) येथील साहेबा गजानन काळे आणि राजापूर (ता. श्रीगोंदे) येथील संतोष राघू शिंदे या दोघांच्या टोळ्यांवर ही कारवाई करण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी या कारवाईस मंजुरी दिली.

नगर तालुक्‍यात २० जुलै रोजी दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपी साहेबा गजानन काळे (वय ४८, रा. दहिगाव, ता. नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या टोळीने नगर, नेवासे, कोतवाली, तसेच दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, रस्तालूट आणि दरोडे घातल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या टोळीने सुमारे सात गुन्हे संघटितपणे केले आहेत. टोळीचे सदस्य परमेश्‍वर रविकांत काळे (वय २०), शिवदास रामदास भोसले (वय २३, दोघे रा. घोसपुरी), विजय गजानन काळे व समाधान गजानन काळे (दोघे रा. दहिगाव, ता. नगर) यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली.

राजापूर (ता. श्रीगोंदे) येथील आरोपी संतोष राघू शिंदे याच्या टोळीने बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये २८ मे रोजी दरोडा घातला होता. या गुन्ह्यात मोक्कान्वये कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे. शिंदेच्या टोळीतील आरोपी चंदू भाऊसाहेब घावटे (वय २८), राजेंद्र बबन ढवळे (वय ३१, दोघे रा. राजापूर), चेतन काळूराम कदम (वय २१), सागर विनोद ससाणे (वय २१, दोघे रा. देवदैठण, ता. श्रीगोंदे), राजू ऊर्फ राजेंद्र मधुकर उबाळे (रा. कुरुंद, ता. पारनेर), शफीक शब्बीर शेख (वय ३४, रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) यांचा मोक्काची कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. शिंदेच्या टोळीवर मारहाण, खुनी हल्ला, चोऱ्या, असे गंभीर १२ गुन्हे बेलवंडी, शिरूर, सुपे (ता. पारनेर), तोफखाना (नगर) पोलिस ठाण्यांत दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : उकाड्यानंतर दिलासा! मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाची हजेरी

Manoj Tiwary : सत्ता जाताच, आपले फिरले! ममता बॅनर्जी सरकारवर भारतीय क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; प. बंगालमध्ये होता क्रीडा मंत्री

Education Success: ग्रामपंचायत शिपायाची मुलगी पूर्वा कदमची बारावीत ८६ टक्के गुणांसह चमक; सीए होण्याच्या स्वप्नाला आर्थिक बळाची प्रतीक्षा

Latest Marathi News Live Update : मोबाईल चोरी अपयशी ठरल्याने महिलेवर हल्ला

Baramati Crime: फेसबुकवर स्वस्त गहूचे आमिष; व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी बोलावून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लूट

SCROLL FOR NEXT