Crime
Crime Esakal
अहमदनगर

Ahmednagar : सात लाखांचे चोरीचे दागिने हस्तगत

सकाळ वत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गंठणचोरी करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल सहा लाख ८० हजार रुपये किमतीचे १३ तोळे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दुचाकी, असा एकूण आठ लाख १० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी : फिर्यादी शैला सीताराम पाटील (रा. तारकपूर बसस्थानकासमोर) व त्यांची मैत्रीण शुभदा दिनकर कुलकर्णी (रा. खंडेलवाल भवनाजवळ, चैतन्यनगर) या घरी जात असताना अज्ञात चोरट्याने पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. दोघे संशयित आरोपी दुचाकीवरून केडगाव बायपास रस्त्याने मनमाडकडे जात होते. त्यानुसार केडगाव बायपास येथे सापळा लावून एकाला ताब्यात घेतले. दुचाकीवर मागे बसलेला आरोपी मात्र उडी मारुन पळून गेला.

पकडलेल्या आरोपीची चौकशी केली असता, तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, मनोहर शेजवळ, सुनील चव्हाण, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, भीमराज खसे, विशाल दळवी, मच्छिंद्र बर्डे, दिलीप शिंदे, रणजित जाधव, विजय धनेधर, योगेश सातपुते, आकाश काळे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे आदींनी ही कारवाई केली.

गंठणचोरी करण्यात पटाईत

आरोपी हा अल्पवयीन असला, तरी तो गंठणचोरी करण्यात पटाईत आहे. तो मूळचा जळगावचा आहे. पारनेर, राहुरी, तोफखाना, राहाता, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव येथे त्याने साथीदारांच्या मदतीने दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीचे गुन्हे केले आहेत. त्याने आठ गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. त्याला पुढील तपासात अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT