St  Sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : एसटीचे १६५ कर्मचारी बडतर्फ

संपकरी एसटी कामगारांवर उगारला बडगा; नगरची स्थिती

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने आता कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीला निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने, बडतर्फीची कारवाई आता प्रशासनाने सुरू केलेली आहे. आजअखेर जिल्ह्यातील १६५ जणांवर बडतर्फ कारवाई करण्यात आलेली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही बसस्थानकांमध्ये खासगी वाहने प्रवासी घेत आहेत. त्याचा फटका आगामी काळात एसटीला बसणार आहे. संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाला सुमारे ४८ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या एसटीचे एकूण तीन हजार ७४३ कर्मचारी आहेत. त्यातील सुमारे १२०० जण कामावर हजर झालेले आहेत. एसटी प्रशासनाने आता कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात केलेली आहे. आजअखेर एकूण २९० जण निलंबित झालेले आहेत. १६५ जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये आज दिवसभरात एकूण २५ जणांवर कारवाई झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT