पाणी टंचाई ई सकाळ
अहिल्यानगर

टँकरच्या प्रस्तावास विलंब केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

राजेंद्र सावंत

पाथर्डी ः तालुक्‍यात काही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित गावांतील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी टॅंकरचे प्रस्ताव तत्काळ पंचायत समितीस न पाठविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड यांनी दिला आहे. (Action will be taken if the tanker's proposal is not submitted soon)

टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर सभापती दौंड यांनी तालुक्‍यातील सर्व गावांतील सरपंच व ग्रामसेवकांना लेखी स्वरूपात सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावातील वाड्या-वस्त्यांवर पाहणी करून जेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल, तेथील टॅंकरचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून पंचायत समितीकडे सादर करावेत.

संबंधित गावांतील ग्रामसेवकांनी टंचाई काळात कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याच्या परिस्थितीची पाहणी करून प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावेत. कोरोनाच्या भीषण संकटात पाण्यासाठी ग्रामीण जनतेचे हाल होता कामा नये.

या बाबत दक्षता घ्यावी. गाव, वाडी-वस्तीवर पाण्याची समस्या जाणवत असेल, तर ग्रामस्थांनी तत्काळ पंचायत समिती प्रशासन अथवा पंचायत समितीचे सभापती, उपसभापतींकडे संपर्क साधावा, असे आवाहनही दौंड यांनी केले आहे. (Action will be taken if the tanker's proposal is not submitted soon)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT