Activists should work to make the state's revenue minister Balasaheb Thorat the future chief minister 
अहिल्यानगर

बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री करायचंय; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश

सुनील गर्जे

नेवासे (सोलापूर) : महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजिवनी देणार्‍या राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना भविष्यात मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे आवाहन श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.
 
मंत्री थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जात असलेल्या काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत नेवासे येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना नागवडे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, कार्लस साठे, गणपत सांगळे, सुदाम कदम,अंकुश कानडे, ज्ञानदेव वाफारे,नेवासे प्रभारी ज्ञानेश्वर मुरकुटे, युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, राजेंद्र वाघमारे उपस्थिती होती. 

सचिन गुजर म्हणाले, काँग्रेसचे राज्याचे नेतृत्व आपल्या जिल्ह्यात आहे हे आपले भाग्यच असून कार्येकर्त्यांनी जिल्हा काँग्रेसमय करण्यासाठी झपाटून कामाला लागावे.

यावेळी तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, उपाध्यक्ष सुनील भोगे, सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, शहराध्यक्ष रंजन जाधव, संदीप मोटे, सचिन बोर्डे, तनवीर शेख, चंद्रशेखर कडू उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT