Adarsh Gaon Hivrebazar followed by two parties in Anna's Ralegan Siddhi 
अहिल्यानगर

आदर्श गाव हिवरेबाजारपाठोपाठ अण्णांच्या राळेगण सिद्धीतही दुफळी

एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपटराव पवार यांच्या ग्रामविकासाचा झेंडा सातासमुद्रापार लागला आहे. त्यांच्या कामामुळे अनेक ग्रामपंचायतीने विकासाची वाट धरली. मात्र, याच ग्रामपंचायतीत आता निवडणुकीच्या निमित्ताने गावगुंडी सुरू झाली आहे. दोन्ही आदर्श गावांमध्ये दुफळी (दोन पॅनल) पडली. या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीची (ता. पारनेर) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. तेथे दोन जागा बिनविरोध निवडून आल्या असल्या, तरी इतर सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

आमदार नीलेश लंके यांनी सर्वात आधी ही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे जाहीर केले होते, परंतु त्यांच्या घोषणेला यश आले नाही. 

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हजारे यांनी अनेकदा प्रयत्न केले. त्यास यश मिळाल्याने महाराष्ट्रातील अनेक गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. राळेगणसिद्धी येथे यापूर्वी अनेक वर्षे बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा होती. मात्र, मागील वर्षी निवडणूक झाली.

या वर्षी नऊ पैकी दोनच जागा बिनविरोध होऊ शकल्या. तेथे अनिल नामदेव मापारी व स्नेहल महेश फटांगरे यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांच्या निवडीची औपचारिकताच बाकी आहे. मात्र, इतर सात जागांसाठी निवडणूक होत आहे. 

दरम्यान, पारनेर तालुक्‍यातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यासाठी आमदार लंके यांनी प्रयत्न केले. बिनविरोध निवड होणाऱ्या गावांना बक्षिसे जाहीर केली. राळेगणसिद्धी येथील इच्छुकांची बैठक घेऊन दोन गटांत जागावाटपही केले.

ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचेही जाहीर करून टाकले. असे असताना, नंतर मात्र इच्छुकांनी अर्ज दाखल केले. आज अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतले जाऊन ही ग्रामपंचायत बिनविरोध होईल, अशी शक्‍यता होती. मात्र, कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर अण्णांच्या गावातही आता ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम पेटणार आहे. निवडणूक बिनविरोध झाली नसली तरी अण्णांसोबत पोपटराव पवारही लोकशाही मानणारे आहेत. त्यामुळे ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Live Updates Marathi : 'पॅलेट गन चालवण्याचा आदेश कुणी दिला? गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं'; प्रियंका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Kaal Sarp Dosh : प्रत्येक कालसर्प दोष एकसारखा नसतो! कोणत्या दोषामुळे होते सगळ्यात जास्त नुकसान? 'या' लोकांना सहन करावा लागतो त्रास

MPSC Exam: 'एमपीएससी'चं चाललंय काय? अपात्र उमेदवारांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय; माहिती व जनसंपर्क विभागाची भरती प्रक्रिया कासवगतीने

SCROLL FOR NEXT