shrirampur esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेत आता प्रशासकराज

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : कोरोनामुळे (Corona) सार्वत्रिक निवडणूक (Election) घेणे शक्य नसल्याने तसेच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब होणार असल्याने येथील नगरपालिकेत आता प्रशासकराज लागु झाला आहे. पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ बुधवारी संपल्यामुळे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी गुरुवारी सकाळी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रातांधिकारी पवार यांनी पालिकेच्या कारभाराची सुरु हाती घेत, विविध विभागाच्या संबधीत अधिकाऱ्यांकडुन आढावा घेतला. निवडणुका लांबणीवर गेल्याने नगरपालिकेवर प्रशासक नेमण्यासाठी राज्य सरकारचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी नुकताच आदेश काढला होता. मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने कळविले होते. त्यानुसार येथील पालिकेवर प्रांताधिकारी पवार यांना प्रशासकपदी नियुक्त करण्याचे आदेश निघाले होते. त्यानुसार प्रांताधिकारी पवार यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून अनुराधा आदिक यांनी २७ डिसेंबर २०१६ मध्ये पदभार स्वीकारला होता. नगराध्यक्षा आदिक यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर प्रशासक नियुक्तीचे आदेश निघाला होता. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. असा प्रस्ताव नुकताच विधानसभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील नगरपालिकेत पुढील निवडणुक होईपर्यंत प्रशासकराज राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT