After the funeral came a call that the patient was critical. 
अहिल्यानगर

कोरोनाबाधितावरील अंत्यविधीनंतर आला रुग्ण क्रिटीकल असल्याचा फोन.. 

सकाळ वृत्तसेवा

नगर : "चला, तुमचे पेशंट क्रिटिकल आहे, पाहून घ्या..' असे म्हणून सही घेतली. नंतर पेशंट गेल्याचे सांगितले. अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये नेले. अंत्यविधी झाला आणि पुन्हा रात्री सव्वा आठ वाजता रुग्णालयातून फोन आला.. "तुमचे पेशंट क्रिटिकल असल्याने दगावले..' मग, सुरवातीला कोणावर अंत्यसंस्कार केले, या प्रश्‍नाने दु:खीत कुटुंबसुद्धा अवाक झाले. 

राहुरी तालुक्‍यातील एका गावातील कोरोनाबाधित रुग्णावर गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी (ता.9) सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. पेशंटची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. सायंकाळी पाच वाजता पेशंट दगावल्याचेही त्यांच्या बहीण व भावाला डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानुसार, कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. मृतदेह ताब्यात देऊन त्यांना अंत्यविधीसाठी अमरधाममध्ये नेले. बहीण-भाऊ दोन तास अमरधाममध्ये थांबले. अंत्यविधी केला. 

अंत्यविधी कोणाचा केला? 

सर्व काही उरकल्यावर ते घरी निघुनही गेले. त्यानंतर रात्री सव्वा आठ वाजता पुन्हा जिल्हा रुग्णालयातून फोन आला, की तुमचा भाऊ सिरिअस आहे. त्यानुसार, नातेवाईक पुन्हा रुग्णालयात आले असता, त्याची तब्येत क्रिटिकल होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला असून, त्याच्यावर सोमवारी (ता.10) सकाळी अंत्यविधी होणार असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. मात्र, सुरवातीला कोणावर अत्यंविधी केला, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहिला... 

असा प्रकार झालेला नाही 

जिल्हा रुग्णालयाचे काम उत्कृष्ट आहे. कर्मचारी सर्व परिस्थिती सांभाळून काम करीत आहेत. कोरोनाबाधित मृतदेहाबाबत असा कोणताही प्रकार झालेला नाही. मात्र, यासंदर्भात माहिती घेण्यात येईल. 
- डॉ. सुनील पोखर्णा, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT