police esakal
अहिल्यानगर

डोंगर पोखरुन हाती उंदिर..! 10 गावांना 100 पोलिसांचा विळखा, सापडले दोघे

विनायक दरंदले

सोनई (जि. नगर) : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने चार वरिष्ठ अधिकारी, अठरा अधिकारी व शंभराहून अधिक पोलिसांनी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५२ जणांच्या झाडाझडतीसाठी शनिशिंगणापूर आणि सोनई पोलिस ठाणे हद्दीतील दहा गावांना विळखा घातला. ही कारवाई म्हणजे डोंगर पोखरून उंदीर निघावा अशीच झाली आहे. (After raiding 10 villages police arrested two accused)

मागील दोन महिन्यांत सोनई व शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चांदे गावात ज्ञानदेव दहातोंडे यांचा खून झाला होता. बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्य संकेत चव्हाण यांच्यावर खुनी हल्ला, तर सोनई व हनुमानवाडीत युवकावर हल्ला झाला होता. या घटनांनी कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. गावठी पिस्तुलाचा वापर करत सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत 'सकाळ'ने वेळोवेळी पाठपुरावा करत बाजू लावून धरली होती.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोनई हद्दीतील ४३, तर शिंगणापूर हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नऊ जणांची झाडाझडती म्हणून विशेष मोहिमेचा आराखडा तयार केला. बुधवारी (ता. २८) मध्यरात्री दोन वाजता सर्व नियोजन झाले. तीन वाजता अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीस अधिकारी व ९० पोलिस कर्मचाऱ्यांनी दहा गावांना वेढा घालत मोहीम राबवली.

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील शनी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. बुधवारी रात्री सुरू झालेली मोहीम गुरुवारी दुपारी दोन वाजता संपली. या कारवाईत शाहरुख ऊर्फ चाट्या जावेद शेख (रा. घोडेगाव) याला गावठी पिस्तुलासह अटक केली. करण बाळासाहेब भंडलकर (घोडेगाव) यास एका तलवारीसह अटक केली. पन्नास जणांच्या घरांची झडती घेतली असता, कुठलेही हत्यार सापडले नाही, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी दिली.

(After raiding 10 villages police arrested two accused)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीपू सुल्तानच्या अंगठीवर राम कोरलेलं, गांधी ते कलाम यांनीही टीपूबद्दल लिहिलंय; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

Mumbai Fire : मुंबईत पहाटे भीषण दुर्घटना! डोंबिवलीत भीषण आग; २९ दुचाक्या खाक, ५ जण जखमी

Latest Marathi News Live Update : भारताच्या विजयासाठी कानपूरमधील मंदिरात प्रार्थना

री-रिलीजपूर्वी सलमान खानची जुनी मुलाखत व्हायरल; ‘तेरे नाम’च्या यशामागचं रहस्य उघड

Tiger Attack: कोलारमेट शिवारात दुचाकीस्वारावर वाघिणीचा हल्ला; गावकरी दहशतीत, वाघाचे दर्शन होणे नित्याचेच

SCROLL FOR NEXT