agitation Sakal
अहिल्यानगर

मुलीचे अपहरण प्रकरण : आरोपीच्या शोधासाठी बेलापुरात आंदोलन

गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. नगर) : बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील एका अल्पवयीन मुलीला गावातीलच एका तरुणाने पळवून नेले. याप्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करावी, तसेच हा तपास स्थानिक शाखेकडे सोपविण्यासाठी येथील महाराणा प्रताप संघटनेतर्फे बेलापुरात आज (शुक्रवारी) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संदर्भात पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बेलापूर येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावत खोटे आमिष दाखवून बेलापूर गावातील एका तरुणाने पळवून नेले. या घटनेला अनेक दिवस उलटून गेले असून, पोलिसांना अद्याप फरार आरोपीचा शोध लागलेला नाही. याबाबत आज (शुक्रवारी) येथील महाराणा प्रताप संघटनेतर्फे बेलापूर येथील नगर बायपाससमोर रास्ता रोको करून स्थानिक प्रशासनाने लक्ष वेधण्यात आले. आंदोलकांनी घटनेचा निषेध करून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा व भाजप ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनीदेखील संतप्त भावना व्यक्त केल्या.

या वेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ व भाजपच्या पुष्पलता हरदास यांची भाषणे झाली. आंदोलनात राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. पोलिसांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर, चार दिवसांत आरोपीस अटक न झाल्यास गाव बंद ठेवण्याचा इशारा देत आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोकोदरम्यान, पोलिस निरीक्षक संजय सानप, हवालदार अतुल लोटके, रामेश्वर ढोकणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना या वेळी निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT