An agitation by planting trees on the road by the youth in Wambori in Rahuri taluka 
अहिल्यानगर

रस्त्यावर रांगोळी, खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन तरुणांकडून प्रशासनाचा निषेध

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : वांबोरी येथे तरुणांनी वांबोरी- डोंगरगण- नगर रस्त्यातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले. प्रशासनाचा निषेध करून, रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही. तर, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विष्णू ढवळे यांनी दिला. तसे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

वांबोरी- डोंगरगण- नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. रस्त्यात तीन ते चार फुटांपर्यंतचे खड्डे आहेत. वांबोरी शहरात मोठी बाजारपेठ आहे. परिसरात केएसबी कंपनी, प्रसाद शुगर कारखाना, बाजार समिती यांची वाहतूक याच रस्त्याने असते. परिसरातील पिंपळगाव, आढाववाडी, डोंगरगण, गड मांजर सुंभा, पाची महादेव या गावातील नागरिकांना वांबोरी व राहुरीला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. कुक्कडवेढे, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, कात्रड, चेडगाव, उंबरे, ब्राह्मणी या गावांना नगरला जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे. त्यामुळे, या रस्त्याने रोज शेकडो वाहने धावतात. 

रस्त्यातील खड्ड्यांमुळे रोज अपघात घडत आहेत. वाहनांचे स्पेअर पार्ट व प्रवाशांचे हाडं खिळखिळी होत आहेत. गंभीर जखमी प्रवाशांना प्राणाला मुकावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला तक्रारी करूनही खड्ड्यांचे दुरुस्ती होत नाही. त्यामुळे संतप्त तरुणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. विष्णू ढवळे, रंगनाथ गवते, अशोक तुपे, दीपक साखरे, राम क्षीरसागर, आदेश सत्रे व इतर तरुणांनी आंदोलनात भाग घेतला.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT