उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार स्वीकारताना शास्त्रज्ञ व कर्मचारी. sakal
अहिल्यानगर

शेतीला जैवतंत्रज्ञानाची हवी जोड : डॉ. मायी

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा स्थापना दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ : शेतीमध्ये दिवसेंदिवस मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न वाढत आहे. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल, लोकांमध्ये निर्माण झालेली वैविध्यपूर्ण अन्नाची गरज, याबाबत उपाय शोधावा लागणार आहे. अन्नाच्या सुरक्षेबरोबरच पौष्टिक सुरक्षेसाठी शेतीला जैवतंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यापीठाच्या ५४ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, परभणी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, कार्यकारी परिषदेचे दत्तात्रय उगले, माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. शंकरराव मगर, डॉ. किसन लवांडे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की अन्नधान्याचा तुटवडा असण्याच्या काळात या विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हापासून गेल्या ५३ वर्षांत विद्यापीठाने संशोधनाबरोबरच शिक्षण व विस्तार कार्यामध्ये भरीव योगदान दिले आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांनी प्रकल्प तयार करून जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले व आभार डॉ. प्रमोद रसाळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT