ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : कृषी विद्यापीठ बारा हजार शेतकऱ्यांना देणार ड्रोन प्रशिक्षण

कुलगुरू पाटील : केंद्र सरकारकडून प्रशिक्षण केंद्रास मान्यता

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात दोन लाख ड्रोन आगामी पाच वर्षांत पुरविले जाणार आहेत. त्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेला केंद्राची मान्यता मिळालेले देशातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशातील पहिले कृषी विद्यापीठ ठरले आहे. आगामी चौदा महिन्यांत बारा हजार जणांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्याचे आव्हान विद्यापीठाने स्वीकारले असल्याची माहिती कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांनी दिली.

राहुरी कृषी विद्यापीठात आज पत्रकार परिषदेत कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यावर मागील ३१ महिन्यांतील प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. प्रभारी कुलसचिव विजय पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.

ते म्हणाले की, मांजरी बुद्रुक (जि. पुणे) येथे कृषी विद्यापीठाच्या शंभर एकर जमिनीवर केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘नमामी गंगे’ राबविला जाणार आहे. आयआयटी कानपूरचे संचालक, केंद्राच्या योजनेचे संचालक व विद्यापीठ संयुक्तपणे हा प्रकल्प राबविणार आहे. तसा सामंजस्य करार झाला आहे. २० कोटींचा हा प्रकल्प आहे. देशातील नद्या प्रदूषित होऊ नयेत, यासाठी या प्रकल्पाद्वारे उपाययोजना सूचविण्यात येणार आहेत.

सातारा जिल्ह्यात खोडवा पिकाचे उत्पादन एकरी १०० टन घेण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सातारा जिल्हा बँक, मिटकॉन व सातारा जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांबरोबर सामंजस्य करार केला आहे. उसासाठी कार्बन क्रेडिट मिळणार असून, मिटकॉनतर्फे शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे आर्थिक लाभ मिळणार आहेत.

बांधकामच्या प्रश्नावर निरुत्तर

यावेळी बांधकाम विभाग व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा ऊहापोह झाला. बांधकाम विभागाच्या प्रश्नांवर कुलगुरू निरुत्तर झाले. त्यावर एक महिन्यात चौकशी करून पुन्हा पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल, असे कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले.

कोरोना संकट, ५० टक्क्यांपेक्षा जास्त रिक्त पदे, अशा समस्यांवर मात करीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यात वेगाने प्रगती केली आहे. विद्यापीठाला विविध पुरस्कार मिळाले आहेत. विद्यापीठातर्फे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत.

- प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT