Ahalyabai Holkar had sent rakhi to the Peshwas 
अहिल्यानगर

अहल्याबाई होळकरांची राखी मिळताच पेशव्यांनी बदलला तो निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जगात भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रेष्ठ मानली जाते या संस्कृतीतील सण, उत्सव आणि परंपरामुळेच.यातील एक म्हणजे महत्त्वाचा सण म्हणजे राखीपोर्णिमा तथा रक्षाबंधन होय.

हा सण भाऊ व बहिण यांच्यातील परम पविञ प्रेमाचे प्रतीक आहे. रक्षाबंधन हा भारतील प्राचीन मानला जातो. भाऊ -बहिणीतील स्नेह आणि कर्तव्यपालनाची जबाबदारी जाणिव करुन देणारा ऊत्सव आहे.  

जरी रक्षा बंधनला कौंटबिक पार्श्वभूमीवर असली तरी पुराण व ऐतिहासिक काळात यास युध्दासंबंधीचे अनेक दाखले मिळतातच.

पुराण कथा अशी आहे

पुराणकाळात देवता आणि  राक्षस यांच्यात घनघोर युध्द सुरु झाले. देवतांचा पराभव होत आहे, असे लक्षात येताच देवांचा राजा इंद्राच्या पत्नीने इंद्राच्या हातात रक्षा करण्यासाठी बंध बांधला. तो याच पौर्णिमेच्या दिवशी. म्हणून रक्षाबंधनाला पुराणकाळापासुन लढाई, युध्दाची पार्श्वभूमीवर आहे असे इतिहास सांगतो. युध्द काय किंवा भाऊ-बहिणीच्या स्नेहाचा हा सण रक्षा करण्याची जबाबदारी अधोरेखीत करताना दिसतो.

सम्राट हुमायुन कर्मावतीने पाठवली राखी

मोगल काळात सम्राट हुमायुन यांच्या काळातदेखील महाराणी कर्मावती हिच्या राज्यावर गुजरातच्या राजाने आक्रमण केले. चतुर व मुत्सदी कर्मावतीने आपल्या राज्यातील लोकांच्या रक्षणासाठी सम्राट हुमायुनकडे राखी पाठवली आणि रक्षणाची मदत मागितली.

ते पञ व त्यासह पाठवलेल्या राखीचा सन्मान करीत सम्राट हुमायुन राणी कर्मावतीस धर्माची बहीण मानून तिचे व तिच्या राज्याचे रक्षण केले, असा दाखला इतिहासात मिळतो.

अहल्याबाईंनी उभारली होती स्त्रियांची फौज

प्रजा रक्षणाची जबाबदारी केवळ उत्सव आणि सणापुरती मर्यादित न ठेवता त्यामागची कर्तव्यपालनाची भूमिका कायम स्मरणात राहावी या उद्देशाने महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी रक्षण करण्याची जबाबदारी केवळ पुरुषांचीच नव्हे तर स्ञीयांची देखील आहे. याचा विचार करुन तत्कालीन परिस्थितीत लढाईसाठी वापरले जाणारे अत्याधुनिक शस्ञास्ञ आपल्या सैनिकांना वापरता आले पाहिजे म्हणून युरोपियन प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षक दरबारात नेमले होते.

पेशव्यांनी आक्रमण करताच..

काही इतिहासकार सांगतात, पेशव्यांनी अहल्याबाईंचे राज्य बुडवण्यासाठी आक्रमण केले. त्यावेळी अहल्याबाईंनी मुत्सद्दीपणा दाखवित पेशव्यांना राखी पाठवली. त्यामुळे त्यांनी आक्रमणाचा बेत रद्द केला. काही जाणकार या घटनेला दंतकथा मानतात. हे काहीही असले तरी अहल्याबाईंचे धार्मिक, राजकीय काम झाकोळत नाही. त्यांनी केलेले मंदिराच्या जीर्णाद्धाराची कामे आजही त्यांच्या कर्तृत्वाची  साक्ष देतात.  

राज्य रक्षणासाठी अहल्याबाईंनी स्ञीयांची स्वतंत्र फौज उभारल्याचे उल्लेख सापडतात. राज्यांचे व राज्यातील प्रजाजनांचे समर्थपणे रक्षण करणारी ही महाराणी मराठेशाहीतील ख-या अर्थाने कर्तृत्ववान राज्यकर्ती होती. राखीच्या माध्यमातून अनेक स्त्रियांनी आपली राज्य वाचवल्याचे पुरावे इतिहासात सापडतात.

- प्रा. नवनाथ काशिनाथ वाव्हळ,  इतिहास संशोधक, अहमदनगर.

संपादन - अशोक  निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT