स्टार्टअप  sakal
अहिल्यानगर

Ahmednaga : निवृत्ती वेतनातून बनविले ‘लॉक’

मोटरसायकल, कार चोरी रोखण्यासाठी व्हीआरएस घेऊन अभियंत्याची किमया

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : मोटार सायकल व कार चोरीला आळा बसण्यासाठी नगरच्या एका अवलियाने नोकरीतून व्हीआरएस घेतली. मिळालेल्या रकमेतून स्वतःचे स्टार्टअप करत मोटारसायकल व कारसाठी लॉक बनविले. या अवलियाचे नाव विलास घोडके असे आहे.

एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या विलास घोडके यांनी २०१६ रोजी कार घेतली होती. काही दिवसानंतर ती चोरीस गेली. त्यामुळे त्यांनी हे दुख: कोणाच्याही वाट्याला येवू नये, यासाठी कारला एक सुरक्षित लॉक तयार करण्याचा निर्णय घेतला. निवृत्तीवेतनातून मिळालेल्या रकमेतून त्यांनी कारच्या क्लचला बसेल असे लोखंडी रॉडच्या लॉकची निर्मिती केली. त्यांनी स्वस्तात हे लॉक विक्रीसाठीही ठेवले आहेत. कारला अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी त्यांनी या लॉकची निर्मिती केली.

ज्यावेळी कार पार्किंग करून ठेवावी लागते त्यावेळी हे लॉक कारच्या क्लचमध्ये टाकून द्यावे लागते. अगदी दहा सेकंदात हे लॉक बसविता व काढताही येते. गॅस कटर अथवा कोणत्याही वस्तूने हे लॉक तोडता येत नाही. हे या लॉकचे वैशिष्ट्य आहे. हे लॉक टाकल्यानंतर कारचा क्लच किंवा ब्रेक दाबला जात नाही. त्यामुळे चोरट्याला कार चोरता येत नाही. लवकर दिसत नसल्याने लॉकची माहिती चोरट्यांना सर्वात शेवटी होते. त्यामुळे कार चोरी होत नाही. पेट घेण्याच्या भीतीने चोरट्याला कारमध्ये गॅसकटरचाही वापर करता येत नाही. हा पर्याय संपल्यानंतर चोरट्याला लॉक तोडणे अशक्य होते. या लॉकला त्यांना पेटंट मिळालेले आहे.

वार्षिक १४ लाखांची उलाढाल

घोडके यांनी २०१७ साली सुरू केलेल्या या स्टार्टअपची उलाढाल १४ ते १५ लाखांवर गेली आहे. २८ वर्षांच्या नोकरीतून निवृत्ती घेत मिळालेल्या रकमेतून हा व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे चार कर्मचारी आहेत. मोटार सायकलसाठीही त्यांनी डीसब्रेक लॉक तयार केले आहे. त्यांच्याकडे रोज शंभरपेक्षा अधिक लॉक तयार होतात.

स्वत:ची कार चोरी गेल्याने एक सुरक्षित लॉक तयार करण्याची प्रेरणा मिळाली. त्यासाठी छोट्या छोट्या वस्तू एकत्र करून लॉक तयार केले. या लॉकमुळे मोटारसायकल व कार चोरीचे प्रमाण कमी होणार आहे.

- विलास घोडके,संचालक ओनम टेक्नॉलॉजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT