ahmednagar  Esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : तीन एकर डाळिंब बागेतून कमावले ३१ लाख; बोरी येथील शेतकऱ्याची नियोजनबद्ध शेती

‘भगवा’ जातीची एक हजार डाळिंबाची रोपे आणून शेतात लागवड केली; दोन झाडांमध्ये १३ बाय ९ फुटांचे अंतर ठेवले.

संजय काटे

श्रीगोंदे - तालुक्यातील बोरी येथील एका शेतकऱ्याने चार वर्षांपूर्वी तीन एकर खडकाळ जमिनीत एक हजार डाळिंबाच्या झाडांची लागवड केली. डाळिंबाची बाग जीवापलिकडे जपली. यंदाच्या नवरात्रोत्सवात त्याला उशिरा आंबेबहार धरला. त्यासाठी नियोजन केले. त्याला चांगले यश आले. चांगला दरही मिळाला. यातून खर्च वजा जाता ३१ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.

ही किमया साधली आहे, दीपक सोनवणे या तरुण शेतकऱ्याने. स्वत:चा ठिबक सिंचन विक्रीचा व्यवसाय करतानाच ते प्रगतिशील शेतीही करतात. त्यांनी चार वर्षांपूर्वी जैन टिश्यूकल्चर नर्सरीतून ‘भगवा’ जातीची एक हजार डाळिंबाची रोपे आणून शेतात लागवड केली. दोन झाडांमध्ये १३ बाय ९ फुटांचे अंतर ठेवले. इतर शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा तेल्या रोगाने अडचणीत असतानाच सोनवणे यांनी जास्त दर कधी मिळतो याचा अभ्यास करून धाडशी निर्णय घेत एप्रिल महिन्यात आंबेबहार धरला. पावसाळ्यात पीक रोगाला बळी पडण्याचा धोका जास्त असतो. त्याशिवाय जास्तीचे दरही मिळत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

हा बहार धरण्यापूर्वी पिकाला सर्व भेसळ डोस टाकले. त्यासोबत लेंडीखत टाकून ४ एप्रिलला पहिले पाणी दिले. यावर्षी परिसरात तेल्याने अनेक बागा नष्ट केल्या आहेत. पण सोनवणे यांनी खते व औषधांचे योग्य नियोजन करून झाडांची छाटणी वेळेवर केली. औषधांचे स्प्रे, जैविक बॅक्टेरियांचे संतुलन व्यवस्थित केले. त्यातून झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाली. त्यामुळे फळांचा रंग व आकार चांगला आल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात...

डाळिंब झाडे १०००

मिळालेला दर १७४ रुपये किलो

एकूण उत्पन्न २१ टन

खर्च ७ लाख

निव्वळ नफा ३१ लाख

सर्व डाळिंबांची शेतातच व्यापाऱ्याला विक्री केली. डाळिंबांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे त्याला १७४ किलो दर मिळाला. हे व्यापारी दिल्ली, गुवाहाटी येथे डाळिंब पाठवित आहेत.

-दीपक सोनवणे, शेतकरी, बोरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT