अपघात sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : कल्याण मार्गावरील अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

चौघे गंभीर जखमी; नागापूरवाडीवर शोककळा

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : नगर-कल्याण महामार्गावर आळे फाट्याजवळील लवणवाडी (ता. जुन्नर) येथे मालवाहतूक वाहनाने दोन दुचाकींवरील आठ जणांना धडक दिल्याने, दुचाकींवरील पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जण पारनेर तालुक्यातील पळशी, वनकुटे येथील नागापूरवाडीचे रहिवासी आहेत.

मृत्यू झालेल्यांमध्ये दोन चिमुकल्यांसह तीन जणांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांची नावे सुंदराबाई रोहित मधे (वय २१), गौरव रोहित मधे (वय सहा), नितीन शिवाजी मधे (वय २२), आर्यन यमा मधे (वय दीड वर्ष), सुहास यमा मधे (वय २४).

सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सर्व जण नारायणगाव येथील शेतीत मजुरीचे काम अटोपून आपल्या गावी परतत होते. गावी परतण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यात चार जणांचा जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विरुद्ध दिशेने समोरून आलेले वाहन न दिसल्याने दुचाकीस्वार व मालवाहतूक गाडी वेगाने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. शेतात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील, चौघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. यात सुंदराबाई, नितीन व गौरव हे तिघे एकाच कुटुंबातील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalamb News: दुष्काळग्रस्तांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ नये म्हणून आमदारांना दोरखंडाचा ‘पहारा’!

चिठ्ठी लिहून घेतल्यानंतर किटकनाशक प्यायला भाग पाडलं, इंजिनिअरिंगच्या २० वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार?; माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या मनातलं ओठावर आलं

भाजपने पक्षसंघटनेत केले मोठे बदल, महाराष्ट्रातील चार नेत्यांवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

न्यूड व्हिडीओ लीक झाल्यानंतर राधिका आपटेला घराबाहेर पडणंही झालं होतं कठीण; म्हणाली, ‘मी खूप घाबरले होते…’

SCROLL FOR NEXT