bus sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : दिवाळीसाठी एसटीच्या जादा ९५ बस

गैरसोय टाळण्यासाठी नियोजन : १० टक्के भाडेवाढ

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाने जादा ९५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना मात्र १० टक्के भाडेवाढीचा फटका बसणार आहे.

दिवाळी व भाऊबी‍जेनिमित्त सुट्या असल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे अहमदनगर विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी वासुदेव देवराज, यंत्र अभियंता नगराळे, विभागीय वाहतूक अधीक्षक अविनाश कल्हापुरे, सहायक वाहतूक अधीक्षक चंद्रकांत खेमनर यांनी जादा बस गाड्यांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातून ९५ जादा बस सोडण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील अकराही आगारांतून पुणे येथे ये-जा करण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत. या बस आजपासून (बुधवार) ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहतील. दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ केली आहे.

ही भाडेवाढ गुरुवार (ता. २०) मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी अवैध प्रवासी वाहनांतून प्रवास करणे टाळावे.

- मनीषा सपकाळ, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, अहमदनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : शेअर बाजाराची उसळी; सेन्सेक्स 1400 अंकांनी वाढला

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT