Adhik Maas Vaan Sakal
अहिल्यानगर

Adhik Maas Vaan : अधिक मासातील वाणासाठी चांदीला पसंती

तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक श्रावण मासामध्ये विशेष महत्त्व आहे. या महिन्याच बहुतेक जण तीर्थक्षेत्रास भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतात.

दत्ता इंगळे

नगर तालुका - तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक श्रावण मासामध्ये विशेष महत्त्व आहे. या महिन्याच बहुतेक जण तीर्थक्षेत्रास भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतात.

या मासात अनेक यात्रा कंपन्या लांब पल्ल्याच्या सहलींचे आयोजन करतात. या अधिक श्रावण मासात लेक- जावयालाही विशेष मान असतो. त्यांना यावेळी देण्यात येणाऱ्या मिष्टान्न भोजना बरोबरच नवीन कपडे, चांदीच्या, तांब्याच्या वस्तू भेट दिल्या जातात. सध्या चांदीच्या वस्तू बनवण्यास पसंती दिली जात आहे.

हिंदू संस्कृतीत अधिक श्रावण मासात अनेक गावातून सामूहिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, पूजन, होमहवन, अन्नदान या कार्यक्रमाबरोबरच आपल्या लेक- जावयाला घरी बोलावून त्याचे आदरातीथ्य करणे. नवीन लग्न झाले असेल तर लेक- जावयासह त्यांच्या कुटूंबियांनाही आमंत्रित करून त्यांच्यासाठी खास धोंडे जेवणाचा बेत केला जातो. या कार्यक्रमाला आता सार्वजनिक रुप येवू लागले आहे.

काही गावात सर्व जावयांना एकत्र बोलावून त्यांचे गावाच्या वतीने आदरातिथ्य केले जाते. तर काही गावातील पुढारी या विशेष मासात आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी धोंडे जेवणाच्या मोठ्या पंगती आयोजित करतात.

अधिक मासात चांदीचे दर वाढले आहेत. महिला वर्गाची जोडवी, कुंकवाचा करंडा, निरंजन, दिवे यांची मागणी वाढत आहे. चांदीच्या वस्तू बनवताना वजनानुसार मजुरी आकारली जाते.

- प्रसाद घोडके, सुवर्ण व्यावसायिक, चिचोंडी पाटील

जोडवी बनवण्यासाठी गर्दी

जावयाला चांदीचे ताट, तांब्या, दिवा, निरंजन देण्याबरोबरच लेकीला पायाच्या बोटातील चांदीची जोडवी बनवण्याची प्रथा वाढीस लागली आहे. महिला वर्ग सुवर्णपेढीत जोडवी बनवण्यासाठी गर्दी करत आहेत. अधिक मासात महिला वर्गातून चांदीची जोडवी बनवण्याची मागणी वाढली असल्याने उशीरापर्यंत सुवर्ण कारागिर आपल्या कामात व्यस्त असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT