In Ahmednagar, the administration took a curfew 
अहिल्यानगर

कोरोना वाढला ः प्रशासनाने संचारबंदी, जमावबंदीबाबत घेतला मोठा निर्णय

गोरक्षनाथ बांदल

नगर ः कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी व दिवसभर जमावबंदीचा आदेश दिला आहे. हा आदेश 23 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी अध्यादेश काढून जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. 

प्रशासनाने लग्नसमारंभांवर निर्बंध घातले आहेत, तसेच सर्व समारंभ, जत्रा, यात्रांना फक्‍त 50 व्यक्‍तींनाच उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली आहे. या सर्वांनी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सचा नियम पाळणे आवश्‍यक आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्‍के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. शाळा- महाविद्यालयांत "नो मास्क, नो एन्ट्री'चा अवलंब करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक संमेलने, विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 50 व्यक्‍तींमध्येच घेण्याचेही आदेशात म्हटले आहे. 
सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत दुकाने सुरू राहणार आहेत. त्यासाठी कुठलेही निर्बंध नसले, तरी सोशल डिस्टन्सचे पालन करावे लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी कामाव्यतिरिक्‍त घराबाहेर पडू नये, तसेच घराबाहेर पडताना मास्क वापरावे, असे आदेशात म्हटले आहे. हे निर्बंध 15 मार्चपर्यंत अमलात राहतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : येवल्यात तासाभरापासून मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT