कार्यकर्ते  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : विरोधकांनी पराभव पचविण्याची मानसिकता करावी ; अंबादास पिसाळ

अंबादास पिसाळ ः पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : विरोधकांनी यापुढे पराभव पचविण्याची माणसीकता तयार करावी, आम्ही संयम बाळगला याचा अर्थ आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. आमचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी दिला आहे. तसे संबंधितांवर कारवाई चे निवेदन प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील यांना देण्यात आले.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली. उलट त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आज कर्जत शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील, तसेच पोलिस निरीक्षक निरावडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले आमदार राम शिंदे यांना आलेली धमकी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरावर आक्षेपार्ह केलेले लिखाण तसेच दिलेल्या घोषणा व आता सचिन पोटरे यांना त्यांच्या घरी जाऊन केलेला प्रकार निंदनीय आहे. राजकारणात हार जीत असते. यापुढे विरोधकांनी हार पचविण्याची माणसीकता ठेवावी, यापुढे असा प्रकार होता कामा नये, तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, तालुका तालीम संघाचे अध्यक्ष प्रवीण घुले, शेतकरी विकास आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, चंद्रशेखर खरमरे यांची भाषणे झाली तर बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, उपसभापती अभय पाटील, संचालक नंदकुमार नवले, सरपंच काका धांडे, तात्यासाहेब माने, भाजपचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, राहुल निंभोरे, शोयब काझी, पप्पूशेठ धोदाड, यश बोरा, धनंजय आगम, सूदर्शन कोपनर, रमेश अनारसे, बापू शेळके, दादा सोनमाळी, अनिल गदादे, गणेश पालवे, राजेंद्र येवले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP number plate Fake : बनावट एचएसआरपी नंबरप्लेट कारखान्यावर छापा, यंत्रसामग्री जप्त; एकास अटक

Water Project : खडकवासला ते फुरसुंगी पाणी प्रकल्पचा एक किलोमीटर बोगदा पूर्ण; चार ठिकाणी खोदाई

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज, तुमच्या भागांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : दिग्दर्शक नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

मोठी बातमी! ३१ डिसेंबर २०२६ रोजी ६ वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार इयत्ता पहिलीत प्रवेश, अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार, वाचा...

SCROLL FOR NEXT