dhanajay jadhav sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : भाजप नेत्याने नाकारले ओबीसी आरक्षण; पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना देणार पत्र

आज राज्यामध्ये आरक्षणावरून जो वाद सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे,

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

अहमदनगर - भाजपचे शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव यांनी स्वतःचे ओबीसी आरक्षण नाकारले आहे. माझे आरक्षण सक्षम नसलेल्या मराठा समाजाला देण्याची धाडसी भूमिका त्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसे पत्र देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आणि ओबीसी समाजात वाद सुरू आहे. अशा वेळी जाधव यांनी आपले ओबीसी आरक्षण नाकारले आहे. ओबीसी आरक्षणाची ज्याला गरज नाही त्यांचे आरक्षण काढून मराठा समाजातील गरजू व्यक्तींना द्यावे, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

आज राज्यामध्ये आरक्षणावरून जो वाद सुरू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना पत्र पाठवणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समाजातील दुर्बल घटकांना आरक्षणाची गरज आहे.

त्यांना आरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी सांगितले. समाजात जातीपातीचे राजकारण सुरू आहे. त्यात राजकीय मंडळी आपली पोळी भाजून घेत आहे. त्यामुळे ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपणच असे वागलो, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे मला आरक्षणाची गरज नाही. माझे आरक्षण सक्षम नसलेल्या मराठा समाजाला द्यावे, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, जाधव यांच्या या धाडसी भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे.

गरजूंना आरक्षण द्या

ज्यांना घरगुती गॅस सबसिडीची गरज नाही, त्यांनी सबसिडीचा लाभ घेऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. देशभरातील लाखो नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत सबसिडी नाकारली होती. गॅस सबसिडीप्रमाणेच आरक्षणाची गरज नसणाऱ्यांनी आपले आरक्षण नाकारून ते गरजूंना देण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.

माझ्या घरात नऊ सदस्य आहेत. आम्ही आर्थिकदृष्टीने सक्षम आहोत. त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही. नगरसेवकपदाची निवडणूक देखील खुल्या वर्गातून लढवलेली आहे. माझे आरक्षण गरजू मराठा समाजाला द्यावे, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे.

धनंजय जाधव, उपाध्यक्ष, भाजप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT