अहिल्यानगर

Cattle Ear Tagging: राज्यातील पशुधनांना ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक, का केली जाते इअर टॅगिंग? जाणून घ्या

साथीच्या रोगांचे अंदाज व त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी राज्यातील सर्व पशुधनांचे इअर टॅगिंग (कानात टॅग) करणे सरकारने बंधनकारक केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ear Tagging Compulsory For Cattle in Maharashtra: पशुधनांची सर्वंकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. तसेच संभाव्य साथीच्या रोगांचे अंदाज व त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी राज्यातील सर्व पशुधनांचे इअर टॅगिंग (कानात टॅग) करणे सरकारने बंधनकारक केले आहे.

इअर टॅगिंग केल्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यासाठी ३१ मार्च अंतिम मुदत दिली आहे. १ जूननंतर इअर टॅगिंग नसल्यास पशुधनाची खरेदी-विक्री करता येणार नसल्याचे शासनाने आदेशात स्पष्ट केले आहे. याबाबतचा आदेश पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काढला आहे.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

काय आहे त्यात?

इअर टॅगिंग करून १२ अंकी बारकोड नंबर देणार

या प्रणालीमध्ये सर्वकष नोंदी घेणार

जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंधत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतराचा समावेश

पशुधनावरील उपचारांसाठी देण्यात येणाऱ्या औषधांचा समावेश

सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रणासाठी इअर टॅगिंग बंधनकारक

इअर टॅगिंग का?

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही

इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास मनाई

ग्रामपंचायतीमध्ये पशूंची विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची इअर टॅगिंग झाल्याशिवाय तो मिळणार नाही (Latest Marathi News)

दाखल्यावर इअर टॅगचा क्रमांक नमूद करावा

इअर टॅगिंग नसेल तर १ एप्रिलनंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक करता येणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT