eknath shinde
eknath shinde esakal
अहमदनगर

Ahmednagar : चौंडीला भेट देणारे शिंदे ठरणार चौथे मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा

जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव म्हणून श्रीक्षेत्र चौंडीला भेट देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथे मुख्यमंत्री ठरणार आहेत. यापूर्वी मनोहर जोशी यांनी दोन वेळा तर विलासराव देशमुख यांनी एक वेळा मुख्यमंत्री म्हणून चौंडीला भेट दिली आहे.

श्रीक्षेत्र चौंडीत ३१ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रियमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे , श्रीमंतराजे यशवंतराव होळकर (तृतीय) यांच्या उपस्थित जयंती कार्यक्रम होत आहे.

दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव  म्हणून चौंडी हे गाव  राज्यात शिवसेना-भाजपा  युती सरकार असताना सन १९९५ मध्ये प्रथमच प्रकाशझोतात आले. २५ ऑगस्ट १९९५ रोजी अहिल्यादेवींच्या २०० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंढे   यांनी चौंडीत हजेरी लावत, येथील   विविध विकासकामांना दोन कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

त्यावर्षापासून अहिल्यादेवी होळकरांची पुण्यतिथी साजरी करण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी तत्कालिन मंत्री अण्णा डांगे यांनी याकामी पुढाकार घेत चौंडीचा कायापालट करण्याचे काम केले. त्यानंतर ११ सप्टेंबर १९९६ रोजी चौंडी येथे देशाचे राष्ट्रपती डाॅ. शंकरदयाळ शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमासही मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी हजेरी लावली होती.

३१ मे २००१ रोजी जयंतीनिमित्त मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर २२ वर्षानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चौंडीला भेट देत आहेत. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांनीही भेटी दिल्या होत्या.

राष्ट्रपती डाॅ. शंकरदयाळ शर्मा यांची चौंडी भेट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या २०१ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त ११ सप्टेंबर १९९६ रोजी देशाचे राष्ट्रपती डाॅ. शंकरदयाळ शर्मा यांनी चोंडीत आले होते.

१९९६ पासून चौंडीत जयंती उत्सवाची सुरूवात

यशवंतसेनेचे सरसेनापती व नंतरच्या काळात राष्ट्रीय समाज पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, माजीमंत्री आमदार महादेव जानकर यांनी ३१ मे १९९६ रोजी अहिल्यादेवी होळकरांची पहिली जयंती चौंडीत साजरी  केली. जानकर यांनी यावर्षापासून अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करण्याचा पायंडा सुरू केला. तो आजही चालूच असून, जयंतीचे स्वरूप वर्षानुवर्ष वाढत गेले.  महादेव जानकर यांनी सन १९९६ साली सुरू केलेला जयंती महोत्सव २०१५ सालापर्यंत २० वर्ष  साजरा केला. दरम्यान  सन २०१६ पासून जयंती महोत्सवाची धूरा तत्कालिन मंत्री व चौंडीचे सूपुत्र अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील  वंशज राम शिंदे यांनी सांभाळली आहे.

दोन राष्ट्रीय अध्यक्षांची चोंडीत हजेरी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजी पुण्यतिथीनिमित्त आणि त्यानंतर ३१ मे २०२२ रोजी जयंतीनिमित्त चौंडीत हजेरी लावली होती. तर १९ सप्टेंबर २०१४ रोजी पंकजा मुंडे यांच्या "पुन्हा संघर्ष यात्रेचा " समारोप कार्यक्रमासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चौंडीत हजेरी लावली होती.

चौंडीला भेट देणारे शिंदे तिसरे केंद्रियमंत्री

३१ मे २०१४ रोजी केंद्रियमंत्री म्हणून गोपीनाथ मुंढे यांनी जयंतीनिमित्त चोंडीत हजेरी लावली होती. तर ३१ मे २०१७ रोजी केंद्रियमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी चौंडीत हजेरी लावली होती. यानंतर चौंडीला भेट देणारे ज्योतिरादित्य शिंदे हे तिसरे केंद्रियमंत्री ठरणार आहेत. दरम्यान ३१ मे २०१८ रोजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजण यांनी चौंडीला भेट दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT