Nagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी निधीसाठीच: शंभूराज देसाई

शंभूराज देसाई; शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात. नीती आयोगाच्या बैठकीत त्यांनी राज्यासाठी १९ हजार कोटी रुपयांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मागील मुख्यमंत्री दिल्ली तर सोडाच, पण मुंबईत असलेल्या मंत्रालयातदेखील जात नव्हते, अशी टीका उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांनी आयोजित केलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. नक्षत्र लॉन्समध्ये आयोजित मेळाव्याला शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिंदे गटाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. देसाई म्हणाले, की मुंबईत आता शिवसेना पक्षप्रमुखांना गटप्रमुखांचे मेळावे घ्यावे लागत आहेत. आधी पक्षातील मोठ्या-मोठ्या नेत्यांना यांची भेट मिळत नव्हती. आता ‘मातोश्री’चे दरवाजे २४ तास उघडे असल्याचे ते सांगतात. हे आम्ही अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो, परंतु तेव्हा त्यांनी आमचे ऐकले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सुरतला नेले नाही, तर या ४० आमदारांनीच त्यांना सुरतला नेले. हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या शिंदे यांच्या खांद्यावर ४० आमदारांनी विश्‍वासाने डोके ठेवले. त्यांचा खांदा मजबूत असून, महाराष्ट्राला विकासात ते पुढे नेतील, असा विश्‍वास मंत्री देसाई यांनी व्यक्त केला.

निधी कमी पडू देणार नाही

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे व भाजप युतीला मिळालेले यश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहावे. तसेच आत्मपरीक्षण करावे. नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसला, तरी जिल्ह्याची विकासकामे प्रलंबित राहणार नाहीत. नगर शहरातील रस्त्यांसह निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.

शिवसेना चौथ्या क्रमांकावर

मी राज्यमंत्री असताना माझी व अन्य शिवसेना आमदारांचीही कामे होत नव्हती. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करीत उद्धव ठाकरे यांनी सत्तापद घेतले. त्याचा परिणाम त्यावेळच्या नगरपालिकांच्या निवडणुकांत दिसून आला. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, तो पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला असल्याचे देसाई म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT