Pakistan : पाकिस्तानात आत्मघाती हल्ला; १३ ठार, ३५ जखमी
वायव्य पाकिस्तानमध्ये शनिवारी रस्त्यावरील पोलिस चौकीवर आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू, तर ३५ जण जखमी झाले. स्फोटात पोलिस चौकीसह परिसरातील वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनेचा तपास सुरू आहे.