Ahmednagar Crime  sakal media
अहिल्यानगर

अहमदनगर : कौटुंबिक वादात लाच घेणाऱ्या पोलिसांवर गुन्हा

दोन भावांच्या कौटुंबिक वादात सहकार्य करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : दोन भावांच्या कौटुंबिक वादात सहकार्य करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. २७) रात्री पकडले. पोलिस हवालदार सुनील उत्तमराव वाघचौरे व पोलिस शिपाई गणेश हरी ठोकळ, अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार व त्यांच्या भावात घराची भिंत बांधण्यावरून वाद होता. हा वाद असलेल्या ठिकाणी तक्रारदारास काम करण्यास सहकार्य करण्यासाठी या पोलिसांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दहा हजार रुपयांत हे काम करण्याचे ठरले. तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांनी श्रीरामपूर शहरात सापळा लावला. लाच स्वीकारताना या दोघांना पकडण्यात आले.

दोन्ही पोलिसांना लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

Sim Card Rules : रिचार्ज न केल्यास सिमकार्ड किती दिवसांनी बंद होतं? नवा नियम आहे खूपच फायद्याचा

SCROLL FOR NEXT