Ahmednagar district SAKAL
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : फळविक्रेत्याचा ग्राहकावर कोयत्याने हल्ला

एक जण जखमी, श्रीगोंद्यातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे - ‘सफरचंद बारीक असल्याने भाव व्यवस्थित लावून दे’ असे म्हटल्याचा राग आल्याने फळविक्रेत्याने ग्राहक दोन तरुणांना शिवीगाळ करून मारहाण केली. यातील एकाला नारळ फोडायच्या कोयत्याने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.

या घटनेत प्रेमदास उबाळे (आढळगाव) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शेखर दत्तात्रय गव्हाणे (रा. आढळगाव) यांच्या फिर्यादीवरून अतिक बागवान, अजर बागवान, जुबेर बागवान (सर्व श्रीगोंदे शहर) यांच्याविरुद्ध श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि जखमी हे रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील बगाडे कॉर्नर परिसरातील फळविक्रेत्याकडे सफरचंदे घेण्यास गेले होते. भाव जास्त सांगितल्याने फिर्यादीने सफरचंद बारीक असल्याने भाव व्यवस्थित लावून दे, असे सांगितले,

पण त्याचा फळविक्रेत्याला राग आला. अजर बागवान याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या वेळी प्रेमदास उबाळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता अतिक बागवान, जुबेर बागवान या दोघांनी फिर्यादी आणि जखमी यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरवात केली. त्याच वेळी अतिक बागवान याने हातातील नारळ फोडण्याच्या कोयत्याने प्रेमदास उबाळे यांच्या डोक्यावर वार केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत.

अतिक्रमण काढण्याची मागणी बगाडे कॉर्नर परिसरात अनेक फळविक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. काहींनी तर रस्त्यावर दुकाने मांडली आहेत. ही सगळी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Neurologist Tips For Better Sleep: तुम्हालाही झोप येत नाही? न्यूरोलॉजिस्ट सांगतात ‘या’ 3 सवयी बदलल्या तर येईल शांत झोप

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

SCROLL FOR NEXT