Ahmednagar Crime mother killed her child Fake abduction police arrested Accused
Ahmednagar Crime mother killed her child Fake abduction police arrested Accused sakal
अहमदनगर

Ahmednagar Crime : जन्मदात्या आईनेच केला चिमुकल्याचा गळा दाबून निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. या वादातून महिलेने पोटच्या पाच महिन्यांच्या मुलाचा गळा दाबून खून करून, मृतदेह विहिरीत टाकल्याची घटना तालुक्यातील कारवाडी येथे घडली. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी याप्रकरणी गायत्री सूरज माळी हिला अटक केली आहे.

याबाबत मृत बालकाचे वडील सूरज शंकर माळी (रा. कारवाडी, दंडवते वस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कारवाडी येथील माळी कुटुंब शेतमजुरी करून उदरनिर्वाह करते. सूरज हा पत्नी गायत्रीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद होत असत. रविवारी (ता. १९) सकाळी साडेनऊच्या सुमारास माळी कुटुंबीय शेतात मजुरी करत असताना घरी शिवम व गायत्री होते.

सातत्याने होणाऱ्या भांडणातून गायत्रीने शिवमला मारहाण करून गळा आवळून त्याचा खून केला. तसेच त्याचा मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत टाकून दिला. दोन अज्ञातांनी शिवमला उचलून नेल्याचा बनाव केला. सूरज व नातेवाइकांनी अज्ञातांचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत.

दरम्यान माळी व नातेवाइकांनी तालुका पोलिस ठाण्यास ही घटना कळविली. पोलिसांना गायत्री हिच्या हालचालींचा संशय आला. त्यातून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता चारित्र्यावरील संशयावरून रोजच्या भांडणाला वैतागून शिवमला ठार केल्याची व दोन जणांनी त्यास पळवून नेल्याचा बनाव केल्याची कबुली गायत्रीने दिली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT