Crime News esakal
अहिल्यानगर

Crime News : खर्डा येथे हॉटेल कामगाराचा खून! पुरावा नष्ट करून प्रेत विहिरीत टाकले, पण...

सकाळ वृत्तसेवा

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे जामखेड रोडवरील हॉटेल पाटील पॅलेस येथे 15 रोजी खुनाची घटना घडली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हॉटेल कामगाराची बॉडी ब्लँकेटमध्ये गुंडाळून खर्डा येथून दहा किलो मिटर अंतरावर मराठवाडा हद्दीतील बेलेश्र्वर मंदिराच्या कमानी जवळील विहिरीत नेहून टाकला.

दोन दिवसांनी ही घटना पोलिसांनी उघडकीस आणली. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपी खर्डा येथील हॉटेल मालकच निघाल्याने खर्डा परिसरात खळबळ उडाली असून यातील आरोपी अक्षय हनुमंत कातोरे रा. खर्डा ता. जामखेड, भरत आगलावे रा. ब्रम्हगाव ता. आष्टी, शुभम एडके राहणार बुलढाणा या आरोपी विरुद्ध वाशी पोलीस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्यासह अनुसूचित जाती जमाती ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत संजय उदमले (वय 25 वर्ष) रा. आडगाव तालुका पाथर्डी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संजय विठोबा उदमले वय 48 वर्ष यांनी रा.आडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांनी 17 मे रोजी रोजी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी याचा मुलगा अनिकेत संजय उदमले राहणार आडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हा गेल्या आठ ते दहा दिवसापासून खर्डा येथील हॉटेल पाटील पॅलेस येथे हॉटेल कामगार म्हणून काम करत होता. तो मागासवर्गीय होता.

हॉटेल मालक अक्षय कातोरे यास त्याने काही कारणामुळे शिवीगाळ केली होती. त्याचा राग आल्याने मालक अक्षय कातोरे व त्याचा कामगार भरत आगलावे या दोघांनी मिळून अनिकेत यास तंदूर भट्टीला टाकायची लाकडे हातात घेऊन त्यास मारहाण केली. तसेच दुसरा कामगार शुभम एडके याने लाथा बुक्याने मारहाण केली.

त्यातच अनिकेत याचा मृत्यू झाला. या तिघांनी मिळून मराठवाडा सरहद्दवर बेलेश्वर कमानी जवळील विहिरीत बॉडीची विल्हेवाट लावली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास एम. रमेश सहायक अधीक्षक कळम, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बुधवंत हे करत आहेत.

खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मस्के, व पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खाडे यांनी मयताची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणून वाशी पोलिसांना मदत केली. यातील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT