crime News 
अहिल्यानगर

Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या दोघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांमध्ये अटक केली आहे. रामेश्‍वर बाप्पा शिंगोळे (वय १९, रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) आणि अनिल सुभाष गोलवड (वय २१, रा. सावेडी नाका, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळविण्यात आले होते. या मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली, की आरोपी रामेश्‍वर शिंगोळे याने अनिल गोलवडच्या मदतीने मुलीला पळविले आहे. मुलीसह तिघे सध्या आष्टी (जि. बीड) येथे आहेत. सानप यांनी एक पथक त्या ठिकाणी पाठवून दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून मुलीची सुटका केली.

अनिल गोलवड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT